एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
बुलढाणा, दि. 14 (जिमाका): आषाढी
वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे लाखो भाविकांची यात्रा
दरवर्षी सुरू असते. यंदा या यात्रेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)
भाविकांच्या सेवेसाठी विशेष पुढाकार घेत 5 हजार 200 जादा बसेसची व्यवस्था केली. या
माध्यमातून 9 लाख 71 हजार 683 भाविक प्रवाशांची सुरक्ति ने-आण करत त्यांना विठ्ठल रुक्मिणीचे
दर्शन घडवून देण्यात आले, अशी ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
प्रताप सरनाईक यांनी दिली.
3
ते 10 जुलै 2025 दरम्यान या बसेसनी 21 हजार 499 फेऱ्या केल्या. या सेवेतून एसटी महामंडळाला
35 कोटी 87 लाख 61 हजार रुपये इतके उत्पन्न झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये
6 कोटी 96 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. 2024 मध्ये 28 कोटी 91 लक्ष रुपये उत्पन्न होते.
“हजारो भाविकांना सुखरूप दर्शन घडवण्यासाठी
अथक मेहनत घेणारे एसटीचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी हे
खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत, असे परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.
एसटी
कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था : वारी काळात पंढरपूर येथे कार्यरत हजारो एसटी
कर्मचाऱ्यांच्या भोजनाची अडचण लक्षात घेता, 5, 6 आणि 7 जुलै रोजी परिवहन मंत्री सरनाईक
यांनी स्वतःच्या खर्चातून मोफत जेवण व चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती. याचा
लाभ हजारो कर्मचाऱ्यांनी घेतला. या उपक्रमाबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक
यांचे आभार मानले. वारी सेवा हे केवळ वाहतूक व्यवस्थापन नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकीचे
उदाहरण आहे, हे यंदाच्या यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment