जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन
जिल्ह्यातील
युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे
रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे
आयोजन
चिखली येथे प्लेसमेंट ड्राइव्ह
बुलढाणा,दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील युवक-युवतींना नामांकित
कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाव्यात आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी यासाठी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत खामगाव आणि चिखली
येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा,
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खामगाव येथील श्री
सिध्दीविनायक टेक्निकल कॅम्पस, जिल्हा शेगाव रोड येथे पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्यात
विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध
करून दिल्या जाणार आहेत.
तसेच याच दिवशी सकाळी १०.३० वाजता जि. एस. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय,
खामगाव येथे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
महामंडळाच्या योजना तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबाबत विशेष मार्गदर्शन
सत्र आयोजित करण्यात आले आहे.
चिखली येथे प्लेसमेंट ड्राइव्ह
याशिवाय, दुपारी १.०० वाजता श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथे
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची नोंदणी प्रक्रिया, स्वयंरोजगार संधी आणि
प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आले आहे. या ठिकाणी देखील नामांकित कंपन्यांकडून
भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले बायोडेटा, फोटो व शैक्षणिक कागदपत्रांसह
वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
“जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार व
प्रशिक्षणाच्या संधी मिळाव्यात हा आमचा मुख्य उद्देश आहे. इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा
लाभ घ्यावा.” - गणेश प्र. बिटोडे, सहायक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा
Comments
Post a Comment