बुलढाण्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; 33 उमेदवारांची प्राथमिक तर 16 उमेदवारांची अंतिम निवड
बुलढाण्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; 33 उमेदवारांची प्राथमिक तर 16 उमेदवारांची अंतिम निवड
बुलडाणा, दि. 15 (जिमाका): जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्याने रोजगार मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यामध्ये 155 उमेदवारांनी नोंदणी करुन 66 उमेदवारांनी
प्रत्यक्ष मुलाखत दिल्या. त्यापैकी 33 उमेदवारांची प्राथमिक तर 16 उमेदवारांची अंतिम
निवड करण्यात आली. तसेच उमेदवारांसाठी कौशल्य ज्ञान, सामान्य चाचणी परीक्षा, रोजगार व स्वयंरोजगार संदर्भात
मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलढाणा आणि स्किल पॅरामेडिकल कॉलेज, बुलढाणा यांच्या
संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उद्योग
केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विष्णू
बचाटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
गणेश बिटोडे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक सुनील
पाटील, कार्यक्रमाचे आयोजक स्किल पॅरामेडिकल
बुलढाणाचे अध्यक्ष सचिन सुपे, कौशल्य विकास अधिकारी संजीवनी नाईकवाडे, श्रीपाद परळीकर
व प्राचार्या श्रीमती पाटील आदी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांसाठी कौशल्य ज्ञान सामान्य चाचणी परीक्षा, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
शिबिर कार्यक्रमांचा समावेश होता. कौशल्य ज्ञान सामान्य चाचणी परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या पैकी प्रथम तीन येणाऱ्या
उमेदवारांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पारितोषिक तसेच प्रमाणपत्र
देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व उमेदवारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात सिद्ध ह्युंडाई बुलढाणा, खानदेश
मोटर्स बुलढाणा, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा, श्री शिवाजी महाविद्यालय चिखली या आस्थापनांच्या
प्रतिनिधींनी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून दिल्या. यावेळी 155 उमेदवारांनी रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी केली तर 66 उमेदवारांनी
प्रत्यक्ष मुलाखत दिल्या. त्यापैकी 33 उमेदवारांची
प्राथमिक निवड करण्यात आली असून 16 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या दिवशी "मी माझा
कौशल्य विकास करणारच" असा संकल्प करा, असे आवाहन महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी
केले. कौशल्य शिवाय पर्याय नाही त्यामुळे कौशल्य गुणांना वाव देऊन व्यवसाय सुरू करा,
असे मत विष्णू बचाटे यांनी मांडले. जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबविण्यात येणाऱ्या
योजनांची माहिती सुनील पाटील यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहायक आयुक्त गणेश बिटोडे
यांनी केले. यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राबविण्यात
येणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन
स्किल पॅरामेडिकलचे अध्यक्ष सचिन सुपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा तसेच स्किल पॅरामेडिकल
कॉलेज, बुलढाणाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





Comments
Post a Comment