अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

 

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

बुलडाणा, दि. 11 (जिमाका):  राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या "प्रति थेंब अधिक पीक" योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी (ठिबक व तुषार प्रणाली) 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. इच्छुक पात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. त्यासोबतच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अनुक्रमे 25 टक्के (अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी) आणि 30 टक्के (इतरांसाठी) पुरक अनुदान देण्यात येते. उर्वरित अनुदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या माध्यमातून 10 ते 15 टक्के पुरक अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना एकूण मिळणारे अनुदान 90 टक्क्यांपर्यंत पोहोचते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा व 8अ उतारे, आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी, सिंचन सुविधेची नोंद किंवा स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. योजनेचा लाभ अधिकतम 5 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येतो.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि विभाग किंवा सीएससी केंद्रावर संपर्क साधावा. 

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या