उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 ; 19 जुलैपर्यंत प्रवेशिकांना मुदतवाढ
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार
2024 ; 19 जुलैपर्यंत प्रवेशिकांना मुदतवाढ
बुलढाणा,दि. 15 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट
पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रण,
समाज माध्यम आणि स्वच्छता अभियान जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार प्रदान केले जाणार
आहेत. पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रसिद्ध झाले
लेखन, छायाचित्रे आणि वृत्तकथांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सादर
करण्याची अंतिम मुदत आता 19 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्य शासनामार्फत एकूण
20 पुरस्कार प्रदान केले जातील. यात 1 राष्ट्रीय स्तरावरील, 11 राज्य स्तरावरील आणि
8 विभागीय स्तरावरील पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने आणि
माहितीपत्रक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या
https://dgipr.maharashtra.gov.in/awards या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. पात्र इच्छुकांनी
जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, बुलढाणा येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त
करावेत. इच्छुकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या
प्रवेशिका निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन
राठोड यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment