आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजनेमुळे वारकऱ्यांचे वाचले प्राण!
आयुष्यमान भारत
आणि महात्मा फुले आरोग्य योजनेमुळे वारकऱ्यांचे वाचले प्राण!
बुलडाणा, दि. 15 (जिमाका): आषाढी वारीसाठी नांदेडवरून आलेले ७५
वर्षीय वयोवृद्ध वारकरी बालाजी संगेकर यांना
वारी दरम्यान अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळीच त्यांची प्रकृती चिंताजनक
बनली. तत्काळ प्रतिसाद देत त्यांना डॉ. काने हॉस्पिटल, पंढरपूर येथे दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीत त्यांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तातडीने
अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.
उपचाराचा खर्च मोठा असूनही, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि
महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत सेवेमुळे श्री. संगेकर यांच्यावर पूर्णतः
मोफत उपचार करण्यात आले. या योजनेमुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक भार न पडता वेळेवर
तातडीची वैद्यकीय मदत मिळाली आणि त्यांचे प्राण वाचले.
योजनेविषयी थोडक्यात माहिती: महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी एकत्रित
आरोग्य योजना लागू केली आहे, ५ लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची सोय, १३५६ आजारांवर
मोफत उपचारांचा समावेश, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सेवा मिळण्यासाठी ETI सेवा उपलब्ध,
राज्यभरात २००० पेक्षा अधिक अंगीकृत खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध
आहे.
000000
Comments
Post a Comment