जिल्हास्तर नेहरू कप हॉकी स्पर्धा; सहभागासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणी करा

 

जिल्हास्तर नेहरू कप हॉकी स्पर्धा; सहभागासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणी करा

बुलडाणा, दि. 31 (जिमाका):  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हास्तर नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सबज्युनिअर (१५ वर्षांखालील मुले), ज्युनिअर (१७ वर्षांखालील मुले व मुली) अशा गटांचा समावेश आहे.

 

स्पर्धेचे आयोजन दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा/संघांनी आपली ऑफलाईन नोंदणी दिनांक ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे करणे आवश्यक आहे. नोंदणीसह संघांची यादी जोडणे बंधनकारक आहे. विहित मुदतीनंतर कोणत्याही संघाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक (फुटबॉल) डॉ. जिवन मोहोड यांच्याशी संपर्क साधावा.

आवश्यक कागदपत्रे :  पात्रता प्रमाणपत्र (Eligibility Form),  जन्मदाखला (मूळ प्रत),  आधार कार्ड,  पासपोर्ट (मूळ प्रत),  १५ वर्षाखालील खेळाडूंना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपुर्ण नाव, जन्मतारीख,   वर्ग, आधार क्रमांक,  शाळेचे नाव व पत्ता,  शाळेचा यु-डायस क्रमांक,  खेळाडूची स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख/मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी आवश्यक राहिल.  स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी त्यांच्या वयानुसार योग्य कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्यास खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे वयोमर्यादा ओलांडल्याचे आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यावी.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याची प्रचिती देण्यासह जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यातील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या