रक्षाबंधनानिमित्त राखी व भेटवस्तू पाठवण्यासाठी डाक विभागाची ‘विशेष राखी मेल सेवा’
रक्षाबंधनानिमित्त राखी व भेटवस्तू
पाठवण्यासाठी डाक विभागाची ‘विशेष राखी मेल सेवा’
बुलढाणा,दि.
१८ : रक्षाबंधन हा भाऊ व बहिणीचा, बंधुत्वाचा, प्रेमाचा आणि
विश्वासाचा पवित्र सण यंदा दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगी
आपल्या बहिणींनी पाठवलेली राखी वेळेत पोहचावी यासाठी बुलढाणा डाक विभागाने विशेष राखी
मेल सेवा सुरू केली आहे.
बुलडाणा विभागातील सर्व प्रधान डाकघरे, उप डाकघरे आणि शाखा
डाकघरे यामधून नागरिक राखी, ग्रीटिंग कार्ड्स आणि भेटवस्तू अत्यंत सहजतेने आणि विश्वासाने
देशभर पाठवू शकणार आहेत.
या सेवेच्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा:
विशेष राखी मेल व्यवस्थेअंतर्गत राख्या प्राधान्याने वितरित
केल्या जातील. स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पार्सल सेवांतर्गत राखी आणि गिफ्ट्स जलद
व सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी. ट्रॅकिंग सुविधेंतर्गत स्पीड पोस्टद्वारे पाठवलेली
राखी व गिफ्ट्स यांचे इंटरनेटद्वारे सहज ट्रॅकिंग करता येईल. परदेशातही राखी पाठवण्याची
सोय या सुविधेंतर्गत इतर देशांतही राखी स्पीड पोस्टने पाठवता येईल.
सर्व नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा आणि रक्षाबंधनाचा
आनंद आपल्या प्रिय व्यक्तींशी डाक विभागाच्या मदतीने साजरा करावा. अधिक माहितीसाठी
आपल्या जवळच्या डाकघराशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश बा. आंभोरे यांच्यातर्फे
करण्यात आले आहे.
०००
Comments
Post a Comment