स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,दि. 22 (जिमाका): सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत स्टँड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. इच्छुक
व पात्र लाभार्थ्यांनी दि. 30 जुलै 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण
कार्यालयाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.
स्टँड
अप इंडिया योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना उद्योग
आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बॅकेचे कर्ज मंजुरीचे पत्र आदी कागदपत्रे सादर करणे
आवश्यक आहे. या योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा करणे आवश्यक
आहे. बॅकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर
उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती
व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा
येथे कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment