देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

 

देऊळगाव राजा तालुक्यातील  48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमामधील तरतुदींनुसार हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या दृष्टीने होणार आहे.

आरक्षण सोडतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध समाजघटकांचे सशक्तीकरण आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित होणार आहे.

ही आरक्षण सोडत दि 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार असून, देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, देऊळगाव राजा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या