जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
बुलडाणा,
(जिमाका) दि. 7: पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी
प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
सुरू झाली आहे. संपूर्ण निवासी स्वरूपाचे शैक्षणिक सत्र 2026-27 करीता पात्र विद्यार्थ्यांनी
29 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.कसर
यांनी केले आहे.
पात्रता : विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये 2025-26 सत्रात
बुलडाणा जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शिकत असावा. विद्यार्थ्याचे पालक हे बुलडाणा
जिल्ह्याचेच रहिवासी असावेत. जन्मतारीख 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 (दोन्ही तारखा धरून) या दरम्यानची असावा, विद्यार्थ्यांने
इयत्ता तिसरी, चौथी, पाचवी सलग सरकारमान्य शाळेतून शिकलेले व उत्तीर्ण असावा.
आवश्यक कागदपत्रे: विद्यार्थी व पालकांच्या स्वहस्ताक्षरीत
सही व छायाचित्र जेपीजी फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावे, अनुसूचित जाती (SC), जमाती
(ST) व इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र अपलोड करणे
आवश्यक.
परीक्षेची तारीख शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 असून अर्ज
www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर नि:शुल्क भरु शकता. सर्व इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी
या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
00000
Comments
Post a Comment