राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम; विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा
राज्य परिवहन
महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम;
विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा
बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा
विभागातर्फे सर्व आगारांमधून पर्यटकांसाठी विशेष पॅकेज टुर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
या टुर्सचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय
वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.
या पॅकेज टुर्स अंतर्गत एक दिवसापासून ते तीन दिवसांपर्यंतच्या
देवदर्शन आणि पर्यटनस्थळांच्या भेटीचा समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगद्वारे
ही सेवा राबविण्यात येणार असून, सर्व आगारांमधून नियोजित स्थळांकरिता वाहतूक सेवा उपलब्ध
करून देण्यात येईल.
एक दिवसांचे पॅकेज टुर्स : अजिंठा लेणी-वेरुळ घृष्णेश्वर-खुलताबाद-परत,
शेगाव-चिखलदरा-परत, पैठण-परत.
दोन ते तीन दिवसचे पॅकेज टुर्स: कपीलधार-तुळजापूर-अक्कलकोट-पंढरपूर-परत,
आळंदी-देहू-भिमाशंकर-परत, शिर्डी-शनिशिंगणापूर-देवगड-परत, औंढा नागनाथ-परळी वैजनाथ-परत,
नाशिक-वणी सप्तशृंगी-त्र्यंबकेश्वर-परत, मुक्ताईनगर-चांगदेव-इच्छापूर-अंमळनेर-परत.
याशिवाय प्रवाशांच्या विशेष मागणीनुसार मध्यप्रदेशातील
ओंकारेश्वर व उज्जैन या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी देखील वाहतूक सेवा पुरविण्यात
येईल. या पॅकेज टुर्सची माहिती, शुल्क, प्रवासाचे वेळापत्रक, बुकिंग प्रक्रिया इत्यादी
तपशीलासाठी आपल्या नजीकच्या एस. टी. आगारास भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन
करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment