बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलडाण्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 जुलैला

राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलढाणा,दि. 3 (जिमाका) :  ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या दि. 13 व 16 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दि. 17 जून 2025 रोजीच्या सुधारित अधिसूचनेनुसार बुलडाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींतील सरपंच पदांचे आरक्षण सोडत 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा निवडणूक इमारत, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

या सभेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासोबतच अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्ग महिला यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या प्रक्रियेस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या