सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,दि.
21 (जिमाका): राज्य शासनामार्फत राज्यातील सहकार चळवळीच्या विकासात उल्लेखनीय
योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना दरवर्षी सहकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येते.
आर्थिक वर्ष 2023-24 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे संस्थांची निवड करण्यासाठी अर्ज
मागविण्यात आले होते. सदर कालबद्ध कार्यक्रमात अंशतः बदल करण्यात आला असून 31 जुलै
2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे. इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव
आवश्यक कागदपत्रांसह तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा
उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
पुरस्काराबाबत सविस्तर माहिती व अर्ज
नमुना http://sahakarayukta.maharashtra.gov.in या सहकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर
तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सर्व सहकारी संस्थांनी संधीचा लाभ घेण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment