बुलडाणा येथे आज पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

बुलडाणा येथे आज पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 14 (जिमाका):  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी स्किल पॅरामेडिकल कॉलेज, वानखेडे ले-आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पिटल जवळ, बुलडाणा येथे सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या वर्षीची थीम Youth empowerment through AI and digital skills आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलडाणा आणि गुरुवारला स्किल पॅरामेडिकल कॉलेज, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होऊन थेट मुलाखती घेणार असून उमेदवारांची प्राथमिक निवड आणि प्रशिक्षणासाठी संधी दिली जाणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी 10 वी, 12 वी, आयटीआय तसेच पदवीधर पात्रता असलेले पुरुष व महिला उमेदवार आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन स्वखर्चाने उपस्थित राहावेत. उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठीही मुलाखत देऊ शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा येथे अथवा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या