जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

 

जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि. 7:  जिल्हा कारागृह, बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंद्यांची तपासणी करून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बंद्यांमध्ये क्षयरोगासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर हे होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्षा गुट्टे यांनी बंद्यांना क्षयरोगासंबंधी मार्गदर्शन केले. शिबिरात बंद्यांची आधुनिक एक्स-रे मशिनद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच क्षयरोगाच्या संशयित रुग्णांचे थुंकीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. या तपासणीतून कारागृहातील आरोग्यस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच क्षयरोगाचे लवकर निदान करून उपचार शक्य होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालयातील डॉ. शिवदास सरोदे, सिध्देश्वर सोळंकी, राजेंद्र सुरडकर, मुकेश घेंगे, राजेंद्र सरोदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेची प्रभावी सुरुवात करण्यात आली असून, बंद्यांच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या