सहकार सप्ताह उत्साहात साजरा; विविध उपक्रमांतून सहकार चळवळीला बळ
सहकार सप्ताह उत्साहात साजरा; विविध उपक्रमांतून
सहकार चळवळीला बळ
बुलडाणा, (जिमाका) दि. 7: आंतरराष्ट्रीय
सहकार वर्ष 2025 व भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या
निमित्ताने जिल्ह्यात 1 ते 6 जुलै दरम्यान सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. विविध
उपक्रमाच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळ देत सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
सप्ताहाचा
शुभारंभ 1 जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा व जिल्हा विशेष लेखापरीक्षक
वर्ग-2, सहकारी संस्था, बुलडाणा यांच्या कार्यालय परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासोबत सहकार व शाश्वतता यांचा सुंदर संगम या उपक्रमातून
दाखविण्यात आला. बधुवार दि.2 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., बुलडाणा यांच्यावतीने
शेतकरी व कर्जदारांसाठी कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना
शेतीसाठी सुलभ दराने कर्जे वितरित करण्यात आले.
गुरुवार दि. 3 रोजी जिल्ह्यातील प्राथमिक
कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांच्यासाठी केंद्रीय योजनांवर माहिती
व चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय सहकार धोरण, बँकिंग, शेतकरी समृध्दी योजनेविषयी
सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवार दि. 4 जुलै रोजी शिवाजी महाविद्यालय, मोताळा
येथे विद्यार्थ्यांसाठी सहकार क्षेत्रावर विशेष व्याख्यान घेण्यात आले. सहकार मूल्ये,
स्वावलंबन आणि ग्रामीण विकासामधील सहकाराची भूमिका या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांमध्ये
जनजागृती करण्यात आली.
शनिवार
दि. 5 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून सहकार क्षेत्रामधील
स्वच्छता आणि शिस्तीच्या मूल्यांना अधोरेखित करण्यात आले. सहकार सप्ताह 2025 मधील हे
विविध उपक्रम जिल्ह्यातील सहकारी चळवळीला अधिक बळकट करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त
करण्यात आला. सप्ताहाचा समारोप रविवार दि. 6 जुलै रोजी केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या
स्थापना दिनानिमित्त विविध रंगांनी सजलेली रांगोळी स्पर्धा आयोजित करून करण्यात आला.
या उपक्रमामध्ये सहकारी संस्थांचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
00000
Comments
Post a Comment