मृत इसमाची(रमेश सुरुशे) ओळख पटविण्याबाबत आवाहन

 


मृत इसमाची(रमेश सुरुशे) ओळख पटविण्याबाबत आवाहन

             बुलढाणा,दि. 21 (जिमाका): पोलिस स्टेशन बुलढाणा (शहर) अंतर्गत रमेश शामराव सुरूशे (वय 45 वर्षे) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दि. 16 जुलै 2025 रोजी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या इसमाचे उपचारादरम्यान, दि. 18 जुलै रोजी निधन झाले. मृत्यूवेळी त्यांच्यासोबत कोणीही नातेवाईक उपस्थित नोव्हते. सदर इसमाचे कोणत्याही नातलग किंवा परिचित व्यक्तीचा शोध लागलेला नसल्याने ओळखीच्या व्यक्ती असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन तपासी अंमलदार यांनी केले आहे.

            सदर मृतकांचा बांधा सडपातळ, उंची सुमारे 5.5 फूट, रंग निमगोरा,  डोक्यावर अर्धवट टक्कल,  काळी-पांढरी मिश्र दाढी राखलेली व वेशभूषा शासकीय रुग्णालयाचा निळ्या रंगाचा परिधान केलेला आहे.  सदर इसमाविषयी काहीही माहिती आहे किंवा नातेवाईक म्हणून ओळखता येतील, त्यांनी तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांशी किंवा हेड क्वॉस्टेबल नरेंद्र रीठे (83099 62324),  विश्वास हिवाळे (83085 78724) या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या