"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम
"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र"
अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम
बुलढाणा, दि. 28 (जिमाका): "हरित
महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या अभियानाच्या अंतर्गत गुरुवार, २४ जुलै रोजी
महिला व बाल विकास भवन, येथे वृक्ष लागवड करण्यात
आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम
पार पडला.
या
उपक्रमांतर्गत वर्ष २०२५ साठी राज्य शासनाने घेतलेल्या १० कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टाचा
एक भाग म्हणून एकूण २२ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणसंवर्धन व हरित महाराष्ट्र
घडवण्याच्या दृष्टीने ही कृती महत्त्वाची ठरत आहे.
कार्यक्रमास
विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये शासकीय मुलींचे बालगृह
व निरीक्षणगृह अधीक्षक सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी श्रीकृष्ण इंगळे व उमेश निकम,
संरक्षण अधिकारी रामेश्वर वसु, दिवेश मराठे यांचा सहभाग होता.
जिल्हा
बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी तसेच चाईल्ड हेल्पलाइन समन्वयक सोहेप शेख व कनिष्ठ काळजी
वाहक अजय सोनूने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
0000
Comments
Post a Comment