कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी दिन साजरा कृषी दिन : ७ जुलैपर्यंत होणार कृषी तंत्रज्ञानाचा जागर

 





कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी दिन साजरा

कृषी दिन : ७ जुलैपर्यंत होणार कृषी तंत्रज्ञानाचा जागर

         

बुलढाणा, दि.4 (जिमाका): हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 01 जुलै कृषी दिन म्हणून कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरा केला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विद्यापीठाचे  कुलगुरू आणि संचालक विस्तार शिक्षण यांच्या संकल्पनेतून आयोजित कृषी सप्ताहाची सुरुवात मौजे आरेगाव ता. मेहकर येथील शेतकऱ्यांच्या शेतावर झाली.

याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील प्रवीण देशपांडे, विषय तज्ञ, पीक संरक्षण, डॉ. सुकेशनी वाणे, विषय तज्ञ, कृषी अभियांत्रिकी आणि डॉ. जगदीश वाडकर, विषय तज्ञ, कृषी विस्तार शिक्षण तसेच नॅशनल सीड कार्पोरेशन चे प्रोडक्शन एक्झिक्यूटिव्ह अभिषेक बिर्ला यांनी भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या शेतातील पिकांविषयी समस्या जाणून घेऊन निराकरण केले.

कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा येथील शास्त्रज्ञांनी यावेळी खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी, हळद लागवड, वाणू व्यवस्थापन, मिरची आणि टोमॅटो पिकावरील किडी व रोगांचे व्यवस्थापन तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आरेगाव येथील प्रक्षेत्र भेटीदरम्यान तसेच मार्गदर्शनास भुजंगराव यादवराव टाले, नारायण बाबुराव गुलगुले, शिवम नारायण गुलगुले गौतम लांडगे, शेख रफिक रामेश्वर खाटेकर, सुभाष मोरे, विलास घाटोळकर, संजय काळे, सुमित टेकाळे, विष्णू भानुदास टाले,असलम खान बिस्मिल्ला खान, हुसेन खान बिस्मिल्ला खान आदी शेतकरी बांधव उपस्थित राहिले.  प्रक्षेत्रावर भेटी व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या आयोजना करिता नंदूभाऊ टाले आणि भारत टाले प्रयोगशील तथा प्रगतशील शेतकरी आरेगाव यांनी परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या