शासकीय आयटीआय मोताळा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
शासकीय आयटीआय मोताळा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलडाणा, दि.3 (जिमाका): सेवागिरी बाबा शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे प्रवेश सत्र २०२५-२६ करीता प्रवेश प्रक्रिया
सुरू झाली असून यंदा विजतंत्री या नवीन व्यवसाय अभ्यासक्रमास शासन मान्यता प्राप्त
झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण २० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय, संस्थेत चालू
वर्षासाठी वायरमन, फिटर, आयसीटीएसएम, प्लंबर, वेल्डर, कोपा, शिवणकाम (ड्रेसमेकिंग),
ब्युटी पार्लर (कॉस्मेटोलॉजी) हे एक व दोन वर्षीय अभ्यासक्रमही प्रवेशासाठी खुले असून
इच्छुक विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
प्रवेशासाठी अर्ज ऑनलाईन
पद्धतीने https://admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरता येणार आहे. सर्व
पात्र उमेदवारांना मोठ्या संख्येने ऑनलाईन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे
आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment