Posts

Showing posts from November, 2025

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

Image
  बुलढाणा, (जिमाका) दि. 29: जळगाव जामोद येथील दि न्यू इरा हायस्कूल येथे ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरू तेग बहादूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळे शरद गोमासे यांनीही माल्यार्पण करून गुरूंना अभिवादन केले. विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात आलेल्या ३ मिनिटांच्या माहितीपूर्ण चित्रफितीतून गुरू तेग बहादूर यांच्या अद्वितीय त्यागाचा, धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचा व मानवतेसाठी केलेल्या अप्रतिम कार्याचा आढावा घेण्यात आला. यानंतर गणेश आसेरकर गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ००००

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

  बुलढाणा, (जिमाका) दि. 28:   जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायातींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.   कार्यक्रमानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, अशा सूचना सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले आहे. उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 28 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल इत्यादी ठिकाणी काम करणारे कामगार व कर्मचारी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल. तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी ...

7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास शुभारंभ

  बुलढाणा, (जिमाका) दि. 28: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलनाचा शुभारंभ रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता “ सैनिकी मंगल कार्यालय ” , जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ध्वजदिन निधी संकलन समिती, बुलडाणा यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ध्वजदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित, पत्रकार बांधव, तसेच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन हा राष्ट्ररक्षकांच्या सन्मानाचा दिवस असून, या दिवशी जमा होणारा निधी हुतात्मा आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजदिनाला सन्मान द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 000000

पुरुष नसबंदी पंधरवडा: बुलढाण्यात आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम

  बुलढाणा, (जिमाका) दि. 28: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात दरवर्षी राबविण्यात येणारा पुरुष नसबंदी पंधरवडा यंदा बुलढाणा जिल्ह्यात 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत विशेष उपक्रमांसह राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, एएनएम तसेच मेडिकल ऑफिसर्स यांच्या माध्यमातून घराघरांत जाऊन पुरुष नसबंदीबाबत जनजागृती केली जात आहे. डॉ. गिते यांनी सांगितले की, कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज बनली आहे. पुरुष नसबंदी ही सोपी, सुरक्षित आणि प्रभावी प्रक्रिया असून याबाबतच्या गैरसमजांना दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया नियोजित पद्धतीने करण्यात येत आहेत. गावांतील बैठका, दैनंदिन भेटी, मेळावे, युवक मंडळांच्या माध्यमातूनही माहिती देण्यावर भर दिला जात आहे.   पुरुष नसबंदीचे फायदे : प्रक्रिया अत्यंत सोपी व पूर्णपणे सुरक्षित, कामधंद्यावर कोणताही विपरीत परिणाम नाही...

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

           बुलढाणा, (जिमाका) दि. 28: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजागार युवक व युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय, म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. 9 ते 13 डिसेंबर 2025 या पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे.          या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हा सुशिक्षित बेरोजगार यांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करावा हा आहे. या प्रशिक्षणात शेळीपालन, कुक्कुट आणि गाय म्हैस पालनाचे तंत्र व प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार व उद्योग सुरु करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. त्यासोबत उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन, शासकीय योजनाची माहितीचे मार्गदर्शन या प्रशिक्षणात तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.                    ...

एकता पदयात्रेस बुलढाणाकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
                 बुलढाणा, (जिमाका) दि. 28: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात आज ‘एकता पदयात्रा’ उत्साहात पार पडली. एन.एस.एस. स्वयंसेवक, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.                पदयात्रा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसी आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, नेहरू युवा केंद्र धनंजय चाफेकर, जिल्हा एनएसएस समन्वय हनुमंत भोसले, प्रकाश केंद्रे, रोहित साळकुटे, दीपक भुसारी, भारत पवार आदी उपस्थित होते.            ...

शासकीय व खाजगी आस्थापनांनी शी-बॉक्स प्रणालीवर नोंदणी करावी

  बुलढाणा, (जिमाका) दि. 28:   सर्व खाजगी व शासकीय आस्थांपनानी तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असून त्यांची नोंदणी शी-बॉक्स प्रणालीवर करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. यासाठी खाजगी व शासकीय आस्थापनांनी कार्यालयात गठीत केलेली तक्रार निवारण समितीची नोंदणी शी-बॉक्स प्रणालीवर (SHE BOX PORTAL) करण्याचे केंद्र शासनाने निर्देश आहे. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शी-बॉक्स ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे.             अशी करा नोंदणी :   खाजगी आस्थापनांनी शी-बॉक्स अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविण्यासाठी https://shebox.wcd.gov.in य...

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

  बुलढाणा,दि.28: जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी दि. 2 डिसेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य असले, तरी यंदा मतदारांना मतदानाच्या दिवशी 12 प्रकारच्या पर्यायी ओळखपत्राद्वारे मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र नसल्यास मतदारांनी मतदानासाठी जातांना 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. मतदानासाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य असले, तरी अनेक मतदारांकडे मतदान कार्ड नसल्याचे आढळून येते. यामुळे मतदानाच्या दिवशी होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 प्रकारची पर्यायी फोटोसहित ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. यात भारताचा पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा द...

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द

  बुलढाणा, (जिमाका) दि. 27:    शेगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या दिवशी अर्थात मंगळवारी शेगांवमध्ये भरविण्यात येणारा आठवडी बाजार   रद्द करण्यात आला आहे. असे पत्रक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. शेगांवमध्ये मंगळवारी आठवडी बाजार भरविण्यात येत असून या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यानुसार दि. 2 डिसेंबर   रोजीचा शेगांव शहर येथील मंगळवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत विविध स्तरातून विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे बुलढाणा बाजार आणि यात्रा कायदानुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन शेगांव शहरामध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीकोणातून शेगांव शहरामध्ये मंगळवार 2 डिसेंबर या दिवशी भरविण्यात येणारा ...

डाक अदालत 8 डिसेंबरला

  बुलढाणा, (जिमाका) दि. 27:    पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी बुलडाणा डाकघर विभागातर्फे सोमवार, दि. 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आले आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये घेतल्या जाणार आहे.              देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात येते. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख स...

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

  बुलढाणा, (जिमाका) दि. 27:    जिल्ह्यात एलसीडीसी कुष्ठरुग्ण शोध अभियान दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 53 नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत जिल्ह्यात तब्बल 1 हजार 8 36 प्रशिक्षित तपासणी पथके कार्यरत असून ते घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत. दि. 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत 17 लाख 3 हजार 408 नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 10 हजार 737 संशयित चट्टयांचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 7 हजार 866 जणांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी पूर्ण झाली आहे. नवीन रुग्णांना 6 महिने ते एक वर्षापर्यंत उपचारांचा कालावधी राहणार असून योग्य उपचार घेतल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असे सहाय्यक संचालक (कुष्ठ), डॉ. हरी पवार यांनी सांगितले. ही मोहीम दि. 2 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार असून आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा तसेच पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन तपासणी केली जात आहे. नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला पूर...

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

  बुलढाणा, (जिमाका) दि. 27: जिल्ह्यात 2 मोठे, 7 मध्यम व 42 ल.पा प्रकल्पांमध्ये 374.59 म्हणजे 97.57 टक्के उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झालेला आहे. बिगर सिंचन आरक्षण बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी साठ्यावर रब्बी हंगाम 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाखा कार्यालयात सादर करावयाचे आहे.             अर्जाचे कोरे नमुने शाखाधिकाारी कार्यालयात विना:शुल्क उपलब्ध आहे. मागणी अर्ज करणारे हे स्वत: शेतीचे मालक असले पाहिजे व अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे.   मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा निरीक्षक अथवा बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे.   पाणी अर्जावर ओलीत कराची थकबाकी आहे अथवा नाही, याबाबत नोंद करणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा रब्बी हंगाम 31 मार्च 2026 पर्यंत राहील. प्रकल्पावरील पाणीसाठा व पिकनियोजनानुसार पाणी पाळ्या देण्यात येतील. 1 एप्रिल 2026 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होईल. अनधिकृत पाणी वापर, मंजूर क्षेत्रापेक्ष...

शेतकरी, शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा संपन्न; ऊस लागवड व व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Image
  बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा मौजे सातगाव म्हसला, ता. बुलढाणा येथे राजूभाऊ उर्फ अवचीतराव पालकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आले. यावेळी कृषी शास्त्रज्ञ व तज्ज्ञांनी ऊस लागवड व व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.   या कार्यक्रमाला पैनगंगा साखर कारखाना, वरुड (धाड)चे अध्यक्ष अनिल गुंजाळ, व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हस्के, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे, डॉ. भारती तिजारे (विषय विशेषज्ञ कृषि विद्या), प्रवीण देशपांडे (विषय विशेषज्ञ किटकशास्त्र), डॉ. जगदीश वाडकर (विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण), मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ञ), डॉ. दिनेश कानवडे (प्रमुख, कृषि संशोधन केंद्र), डॉ. आशुतोष लाटकर (कृषि शास्त्रज्ञ), मनोजकुमार ढगे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी) तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विजय भुतेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   राजूभाऊ पालकर यांनी प्रास्ताविकातून ऊस लागवड ही फायदेशीर शेती असल्याचे सांगून शेतकर...

संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन

Image
  बुलढाणा, दि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.   २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव शेलार,   जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 0000                                                              

बुलढाणा सामाजिक न्याय भवनात संविधान दिन उत्साहात साजरा

    बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय तसेच इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी   समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एम.एम. मेरत, इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालयाचे दिपाली पाडवी यांच्यासह सर्व शासकीय, निमशासकीय आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना दिपाली पाडवी यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांची जाण व जपणूक करण्याचे आवाहन केले. यावेळी एम.एम. मेरत यांनी भारतीय संविधानाच्या 75 वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात येणाऱ्या संविधान अमृत महोत्सव उपक्रमाची माहिती दिली. घर घर संविधान या मोहिमेअंतर्...

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या गौरवशाली स्मृती सोहळ्याचे नागपूर येथे आयोजन

Image
    ·                ३५० वा शहिदी समागम शताब्दी वर्ष ·          जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी डॅा किरण पाटील यांचे आवाहन ·          जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा   बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी" वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती आणि शीख-सिकलीकर, बंजारा-लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर रोजी नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, २४ जानेवारी रोजी नवी मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्मृती सोहळा होणार आहे. या सोह...

कुऱ्हा गावात कुष्ठरोग शोध मोहीम: 723 नागरिकांची केली तपासणी

  बुलढाणा, (जिमाका) दि. 25 : कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागातर्फे आज मौजे कुऱ्हा येथे एलसीडीसी अंतर्गत विशेष कुष्ठरोग शोध मोहीम व सर्व्हेक्षण राबविण्यात आले. यावेळी कुऱ्हा गावातील 723 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून तपासणीदरम्यान कुष्ठरोगाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम पार पडला. तालुका नोडल अधिकारी डॉ. अमित भामरटकर आणि अवैद्यकीय सहाय्यक पी. एस. ढोण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पथकाच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कुष्ठरोगाविषयी जागरूकता, प्रारंभिक लक्षणे आणि लवकर निदानाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा गावात एकूण 6 आरोग्य पथकाद्वारे 145 घरांतील 723 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 8 जणांमध्ये त्वचेवरील विविध प्रकारच्या तक्रारी आढळल्या असून त्यांची त...

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 25 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित तसेच कायम विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले आहे. सन 2025-26 शैक्षणिक सत्रासाठी महाडीबीटी पोर्टल http://mahadbt.maharashtra.gov.in वर नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी योजनेची कार्यप्रणाली व इतंभुत माहिती करीता शासन निर्णय दिनांक 17 जानेवारी 2022 तसेच महाडीबीटी पोर्टलवरील सूचनांचा अभ्यास करून निर्धारित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अभ्यासक्रम व पात्रता : अकरावी, बारावी, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., बी.एसडब्ल्यू, एम.एसडब्ल्यू, बी.लिब., एम.लिब., ए.एन.एम., जी.एन.एम., डी.एड., बी.एड., एम.एड. तसेच शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, कृषी, पशुधन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमातील ...

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 25 :   भारतीय संविधानास 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालयात दररोज संविधान वाचन, भारतीय संविधानाचे महत्व तसेच जातवैधता प्रक्रियेबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे. सन 2025-26 या वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात राखीव प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समितीकडून आवश्यक ते सर्व सहाय्य पुरविण्यात येणार आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही दिले जाणार आहे. ज्या दावा प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्याबाबत अर्जदारांना CCVIS पोर्टलमार्फत SMS व ई-मेलद्वारे सूचना पाठविण्यात येत असून, अर्जदारांनी तत्काळ समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटी पुर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीकडून अशा प्रकरणांवर प्राधान्याने कार्यवाही के...

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

           बुलढाणा, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षीच्या रबी हंगामासाठी राबविण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. सुधारित पिक विमा योजनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर तर गहू, हरबरा कांद्यासाठी 15 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कृषि उपसंचालक अ. भा. गावडे यांनी केले आहे.   जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी 2025-26 हंगामकरिता Cup & Cap model (80:110) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र धरून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.   योजनचा उद्देश : नैसर्गिक आपत्ती, कीड   आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे,   शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्य...

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 24 (जिमाका ):   जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडुन त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करतात. त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी रब्बी हंगाम 2025 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एम.डी. ढगे यांनी केले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे. दिनांक 20 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम 2025 मध्ये बुलढाणा जिल्ह्याकरीता ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी शेतकरी स्वतःच्या शेतावर त्या ...

आपत्तीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटींची मदत जमा - जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांची माहिती

  ·          शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याचे केले आवाहन बुलढाणा,दि.24(जिमाका) : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या फार्मर नोंदणी असलेल्या ५ लाख ६ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३५० कोटी रुपयांची मदत डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. फार्मर आयडी नसल्यामुळे नुकसान भरपाई वितरित करण्यात अडचणी येत असून उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ आपला फार्मर आयडी काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५ लाख ९६ हजार १४५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ४१० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. त्यापैकी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) असलेल्या शेतकऱ्याऱ्यांच्या बॅंक खात्यात ही मदत जमा करण्यात आली आहे. परंतू उर्वरित शेतकऱ्यांनी अद्यापही आपले फार्मर आयडी काढलेले नसल्याने शेती पीक नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे   शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत जवळच्या सीएससी केंद्रावर जावून आपला फार्मर आयडी तत्काळ तयार करुन घेणेयाचे आवाहन जिल्हाधिकारी डॅ...