Posts

Showing posts from October, 2025

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन पालक सचिव शैला ए, जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांचे अभिवादन

Image
    बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.   जिल्ह्याचे पालक सचिव शैला ए., जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा नाझर मोतेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ००००

सामाजिक बांधिलकी समजून शासकीय योजना राबवाव्यात - पालक सचिव शैला ए. · पालक सचिवांनी घेतला जिल्हास्तरीय आढावा

Image
    बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना सामाजिक बांधिलकी समजून प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना वित्त विभागाच्या सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव शैला ए. यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.   जिल्ह्याच्या पालक सचिव झाल्यानंतर त्या शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरीय आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव   खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांचे सह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते   बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला त्यानंतर आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली. या बैठकीत पालक सचिव शैला ए यांनी जिल्ह्...

केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश • मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी

Image
 •      सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘सरदार 150 युनिटी मार्च ’ उत्साहात संपन्न   बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे. सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भारताच्या एकतेचा आणि स्वावलंबी भविष्यासाठीच्या संकल्पाचा संदेश आत्मसात करावा, असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.   केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, पदयात्रेचे उद्दिष्ट तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचा संदेश पोहोचविणे हे असून, संपूर्ण राज्यात 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान गुजरातमधील करमसदपासून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी ’ केवडिया येथे राष्ट्रीय पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत उत्स्फुर्तने सहभागी होऊन सरदार पटेल यांच्या कार्य जनसामान्यपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन क्रीडा राज्यमंत्री यांनी केले.   सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “ स...

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

    बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम हे दि.4 नोहेंबर   2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.   सकाळी 10.30 वाजता बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथील सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसोबत जिल्हा परिषदकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी अनुसूचित जाती साठी प्राप्त होणारा निधी बाबत अढावा व तपासणी.   दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी बुलढाणा येथील सभागृह हॉलमध्ये जिल्हाधिकारी भंडारा यांचे सोबत संविधान-05 निधी बाबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता नगरपरिषद येथील सभागृह हॉलमध्ये नगर परिषद मुख्याधिकारी यांचे सोबत नगरपरिषदकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आ...

बुलढाण्यात मंगळवारी(दि.4) पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

  बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर बुलडाणा आणि श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा जि. बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावी आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्...

३ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींचे निरसन करण्यासाठी दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे.                 तक्रारदारांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनी स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास आपली तक्रार प्रभारी अधिकारी लोकशाही दिन सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे नावे रजिस्टर पोस्टाने पाठविण्यास हरकत नाही.   तसेच तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारी सर्व निकषांचे अवलोकन करुन परिपूर्ण स्वरुपातच जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे तारखे आधीपर्यंत कार्यालयास प्राप्त होतील अशा   हिशेबाने   रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात.   ·          अर्जदारांनी अर्ज करतांना स्विकृतीचे निकष : 1.अर्ज विहीत नमुन्यात केलेला असावा. 2. तक्रार / निवेदन वैयक्तीक स्व्‍रुपाची असावी. 3. चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमून्यात ...

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत मदरसांना अनुदान; · 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 30: राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय उभारणी आणि शिक्षकांच्या मानधनासाठी शासन स्तरावरून 10 लाखांपर्यंतचे अनुदान उपलब्ध होणार आहे. ही योजना शासन निर्णय क्रमांक अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6, दि. 11 ऑक्टोबर 2013 तसेच शासन निर्णय दि. 22 डिसेंबर 2023 च्या तरतुदीनुसार राबविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील इच्छुक मदरसांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी राहुल पवार यांनी दिली आहे. अटी व शर्ती : मदरसा चालवि...

पायाभूत सुविधा अनुदान योजनेंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना अनुदान; · 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  बुलढाणा, (जिमाका) दि. 30 : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी “ पायाभूत सुविधा अनुदान योजना ” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत वार्षिक कमाल 10 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असून अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांनी केले आहे.  शासन निर्णय क्रमांक अर्वाधिय-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६ दिनांक ७ ऑक्टोबर २०१५ तसेच ७ ऑक्टोबर २०२४ नुसार पायाभुत सुविधासाठी अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना शासनमान्य खाजगी अनुदानीत, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच नगरपरिषद क्षेत्रातील शाळांसाठी लागू आहे. संबंधित संस्थांमध्ये किमान 70 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी (अपंग शाळांसाठी 50 टक्के) शिकत असल्यास अर्ज पात्र मानला जाईल.                 शाळा इमारतींचे नूतनीकरण व डागडुजी, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व...

जिल्हा रुग्णालयातील 5 नोव्हेंबरचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

    बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : येथील जिल्हा रुग्णालयात नियमितपणे प्रत्येक बुधवारी अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड कार्यरत असतो. मात्र येत्या बुधवार दि. 5 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्यामुळे त्या दिवशी होणारे अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे. सदर दिवशी नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे दिव्यांग तपासणीस येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिक जर त्या दिवशी तपासणीस आले, तर झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर 30 नोव्हेबरपर्यंत स्वाक्षरी करावी; जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

    बुलडाणा,(जिमाका) दि.29: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. तसेच स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक नमुद करावा. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.   याबाबत निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे. 0000

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत; पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

    बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.   या कालावधीत पात्र मतदारांनी आपली नावे नोंदवून घेणे अत्यावश्यक असून, कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची दक्षता स्वतः मतदारांनी घ्यावी. मतदार नोंदणीसाठी पात्र व्यक्तींनी नमुना क्रमांक 19 मध्ये अर्ज सादर करावा. मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (4) नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीची व्दितीय पुर्नप्रसिद्धी 25 ऑक्टोबर 2025   रोजी करण्यात आली आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्या, नगरपरिषद कार्यालये तसेच संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासंबंधीचा सवि...

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त सरदार 150 एकता अभियान · विविध उपक्रमाचे आयोजन · ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

Image
    बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “ सरदार 150 एकता अभियान ” अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी पत्रकार परिषदेत केले. जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवे, एनएसएसचे पवन जगताप आदी उपस्थित होते. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि ‘माय भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने “ विकसित भारत पदयात्रा ” हा देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचा संदेश पोहोचविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. “ आजचा तरुण म्हणजे उद्याचा भारत ” या भावनेतून युवकांना राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमाशी संबंधित सर्व माहिती ‘माय भारत’ पोर्टलवर (https://mybharat.gov.in/pages/unity_march) उपलब्ध आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मं...

जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावे जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांचे आवाहन

    बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : महसूल व वन विभागाच्या २३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार एम-सॅण्ड (कृत्रिम याद) धोरण निश्चित करण्यात आले असून शासनाने याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चीत केली आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या ५० इच्छुक पात्र अर्जदारांना एम-सॅन्ड बाबत विविध शासकीय सवलती देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सॅन्ड) युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांनी केले आहे.   एम-सॅण्ड युनिट स्थापनेसाठी सवलती मिळणार आहेत. त्यानुसार औद्योगिक प्रोत्साहन अनुदान, व्याज अनुदान, वीज दर अनुदान, विद्युत शुल्क सवलत, मुद्रांक शुल्क माफी, रॉयल्टीमध्ये रु. ४०० रुपये प्रति ब्रास सवलत देवून (२०० रु प्रतिब्रास दराची तरतुद), शासन/निमशासकीय बांधकामांमध्ये सध्या एम-सॅन्डचा २० टक्के वापर बंधनकारक, टप्प्याटप्याने हे प्रमाण १०० टक्के एम-सॅण्ड वापर बंधनकारक आहे.   एम-सॅण्ड धोरणानुसार कोणाला लाभ घेता येईल मंजूर खाणपट्टा असलेले व्यक्ती/संस्था जर "१०० टक्के एम-सॅण्ड उत्पादन" करणार असतील, तर त्यांनाही धोर...

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  ·          १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन ·          तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक , पर्यावरण तज्ज्ञ , आणि धोरणकर्त्यांचा समावेश   बुलढाणा/ मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘ मुंबई क्लायमेट वीक ’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे , महापालिका आयुक्त भूषण गगराणी , विभागाच्या सचिव जयश्री भोज , प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख...

सैनिकी सभामंडप भाड्याने उपलब्ध; माजी सैनिक, विधवा व अवलंबितांना विशेष सवलत

    बुलडाणा, (जिमाका) दि. 28 :   येथील सर्व सुविधा उपलब्ध असलेले, सुसज्ज व भव्य सैनिकी सभामंडप आता सर्वसामान्य नागरिकांसाठी भाड्याने उपलब्ध करण्यात आले आहे. हा सभामंडप जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात, एस.टी. बस स्थानकापासून केवळ 25मीटर अंतरावर असून लग्न समारंभ, वाढदिवस, सभा तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरता येणार आहे.   सदर सभामंडप सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या, योग्य व माफक दराने भाड्याने दिला जाणार असून, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा आणि अवलंबितांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 00000