पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा   

बुलढाणा,दि.14 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 14 व 15 ऑगस्ट 2025 रोजी दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

            त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार  दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता  शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम, दि.15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजती जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम, व नंतर महसुल भवन च्या भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 10.30 वाजता बर्दिया टाईल्स शोरुमच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वाजता सिंधू अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी बुलढाणा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीनंतर शासकीय निवासस्थान बुलढाणा येथे राखीव, रात्री 7 वाजता  अमदापुर ता.चिखली येथील डॉ.विशाल देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या