उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे - प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

 उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र

पुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे

- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

बुलढाणा, दि. 25 (जिमाका): राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, वाचकांसाठी चांगल्या सेवा व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतात.

या पुरस्कारांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे एक लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये व 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय, राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

सन 2024-25 या वर्षासाठीचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. संचालक श्री. अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या