इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या लघु उद्योग व्यवसाय व शिक्षण कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घ्या !
इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या
लघु उद्योग व्यवसाय व शिक्षण कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घ्या !
Ø इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन
Ø 1 ते 50 लाखांपर्यंत कर्ज मिळणार
बुलढाणा, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत मुख्य कंपनी व 13 उपकंपन्यांमार्फत लघुउद्योग व्यवसाय तसेच शिक्षणाकरिता कर्ज पुरवठा करण्यात येतो. सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता महामंडळाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र इच्छूकांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी केले आहे.
|
महामंडळाच्या प्रमुख योजना :- थेट कर्ज योजना – मर्यादा रु. 1.00 लाख, 20 टक्के बीज भांडवल योजना – मर्यादा रु. 5.00 लाख, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना – मर्यादा रु. 15.00 लाख, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना – मर्यादा रु. 20 लाख, गट कर्ज व्याज परतावा योजना – मर्यादा रु. 50 लाख, महिला स्वयंशिद्धी व्याज परतावा प्रमुख योजना आहेत. |
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे संपर्क साधावा किंवा संपर्क क्रमांक 07262-248285 तसेच ऑनलाइन अर्जासाठी महामंडळाची www.msobcfdc.org अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
0000
Comments
Post a Comment