कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत इस्त्राईल येथे घरगुती सहाय्यक पदासाठी रोजगाराची संधी
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत
इस्त्राईल येथे घरगुती सहाय्यक पदासाठी रोजगाराची संधी
बुलढाणा,
दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील पुरुष व स्त्री उमेदवारांना, इस्त्राईल
येथे घरगुती सहायक या कामासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुकांनी
या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र बुलडाणा चे सहायक आयुक्त श्री ग. प्र. बिटोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या
25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या संधीचा लान घेण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे
"घरगुती सहायक" सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतीय सक्षम प्राधिकरणाव्दारे प्रदान
केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा
नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम
जीएनएम / बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
नोकरीचे वर्णन व तपशील पुढीलप्रमाणेः घरगुती सहायक पदाचे नाव असून त्यास किमान पात्रता
10 वी उत्तीर्ण, अनुभव, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र काळजीवाहक सेवा प्रदान करण्यासाठी
पात्र आणि भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणाकडून जारी केलेले प्रमाणपत्रधारक असावा.
नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स सहाय्यक, किंवा प्रसूतीशास्त्र प्रशिक्षण पूर्ण केलेला,
ज्याच्याकडे संबंधित भारतीय प्राधिकरणांकडून डिप्लोमा मान्यताप्राप्त आहे.
GDA/ANM/GNM/BSC Nursing / Post BSc Nursing इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक वयोमर्यादा
25 ते 45 वर्षे. पुरुष/स्त्री उमेदवार पात्र. उंची/बजन किमान 5 फूट / 45 किलो किंवा
अधिक. पासपोर्ट वैधता किमान 3 वर्षे. इतर आवश्यकता उमेदवाराने पूर्वी इस्राईलमध्ये
काम केलेले नसावे. त्याचा / तिचा जोडीदार, पालक किंवा मुले इस्राईलमध्ये सध्या काम
करत असू नयेत किंवा इस्राईल रहिवासी नसावा.
इजराइल येथे नोकरी इच्छुक उमेदवारांनी
www.maharashtrainternational.com या संकेतस्थळावर नोंदणी करून परदेशातील रोजगार संधीचा
लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
प्रशासकीय इमारत, तळमजला, बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत अथवा कार्यालयाच्या दूरध्वनी
क्रमांक 07262-242342 संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र चे सहायक आयुक्त श्री ग. प्र. बिटोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment