खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश
प्रक्रिया सुरू
बुलढाणा,दि.19
(जिमाका): संतगुरू
श्री अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण
योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश सत्रासाठी संस्थेत एकूण
95 रिक्त जागा उपलब्ध असून उमेदवारांनी दि. 22 व 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत
प्रत्यक्ष संस्थेत येऊन ऑनलाईन नोंदणी व हजेरी नोंदवावी.
नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची मेरीट यादी तयार केली
जाणार असून, त्यानुसार रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांनी
25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता संस्थेत प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे, असे आवाहन
संस्थेचे प्राचार्य श्री. एस.डी. गंगावणे व उपप्राचार्य श्री. व्ही.व्ही. काळे यांनी
केले आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असेही संस्थेतर्फे
कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment