बाल हक्क संरक्षण विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बाल हक्क संरक्षण विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बुलढाणा,दि.21 (जिमाका): बाल हक्क संरक्षण विषयक दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा
श्री शिवाजी हायस्कूल, बुलढाणा येथे दि. 19 व 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली.
यावेळी पोक्सो अॅक्ट 2012, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2013, बाल
विवाह प्रतिबंध अधिनियम 2006, ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका, बाल न्याय (मुलांची
काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलढाणा, शिक्षण विभाग तसेच जिल्हा महिला आर्थिक
विकास महामंडळ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील 160 शाळा व महाविद्यालयातील
मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष/सदस्य तसेच महिला बचत गटांच्या
अध्यक्ष/सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव नितीन पाटील यांनी बालकांच्या
लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरील कायद्यांची माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
दिवेश मराठे यांनी बाल विवाह प्रतिबंध आणि शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. संरक्षण
अधिकारी रामेश्वर वसु यांनी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समितीचे कामकाज सांगितले.
शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी वैशाली उचरहांडे यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी सोशल
मीडियावरील धोके व सायबर क्राईमविषयी माहिती दिली. डॉ. मनोज डांगे यांनी बाल कल्याण
समितीची भूमिका मांडली, तर मानसोपचार तज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी बालकांवर होणाऱ्या
अन्याय व अत्याचाराचे मानसिक दुष्परिणाम स्पष्ट केले. संरक्षण अधिकारी गजानन कुसुंबे
यांनी बाल न्याय अधिनियम 2015 विषयी माहिती दिली.
या
कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार व्ही.के. कुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी
अनिल अकाळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पवार, परिविक्षा अधिकारी श्रीकृष्ण
इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक शेख सोयप यांनी
प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रदीप सपकाळ यांनी तर आभार मोहण बावणे व निलेश चौथनकर
यांनी केले.
00000
Comments
Post a Comment