शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान; उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शिक्षक
पात्रता परीक्षा (TET) घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 14 फेब्रुवारी
2025 रोजी परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. सदर परीक्षेत पात्र
उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेकडून जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक)
कार्यालयास प्राप्त झाली असून, त्यांचे वितरण दि. 1 ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत
कार्यालयीन वेळेत होणार आहे. उमेदवारांनी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी स्वतः उपस्थित
राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.
बुलढाणा
जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा 11 केंद्रांवर घेण्यात आली होती. प्रमाणपत्र प्राप्त
करताना उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक असून, त्यांना परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका,
डी.टी.एड/बी.एड उत्तीर्ण गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे
प्रमाणपत्र, माजी सैनिकांचा पुरावा (लागू असल्यास) तसेच आधार/पॅन/मतदार ओळखपत्र इत्यादी
ओळखपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही.
तसेच बुलढाणा परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पेपर-1 व पेपर-2 ची
यादी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
00000
Comments
Post a Comment