पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते महसूल भवनाचे भूमिपूजन

 

बुलढाणा,दि. 15 (जिमाका) : सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सुविधा मिळाव्या या दृष्टिने जुन्या तहसील कार्यालय येथे नवीन महसूल भवन उभारण्यात येणार आहे. या महसूल भवन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोणशिलेचे अनावरण पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.



या भूमिपूजन सोहळ्याला विधानपरिषद आमदार धीरज लिंगाडे, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, तहसिलदार विठ्ठल कुमरे व तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



 

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या