शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज 27 ऑगस्टपर्यंत करा
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज 27 ऑगस्टपर्यंत
करा
बुलढाणा,दि.21 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील ओबीसी, विमुक्त
जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासोबतच
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा
लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 27 ऑगस्ट
2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
अर्जाची प्रक्रिया व निवड याद्या
http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून शासन निर्णयातील
अटी व शर्ती लागू राहणार आहेत.
अर्ज स्वीकृती व निवड वेळापत्रक : अर्ज भरण्याचा कालावधी
17 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2025, अर्ज छाननी 28
ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025, पहिली निवड यादी 3 सप्टेंबर 2025, प्रवेशाची अंतिम मुदत
12 सप्टेंबर 2025, रिक्त जागांसाठी दुसरी निवड यादी 15 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर
2025 प्रमाणे राहिल. विद्यार्थीनींनी मुदतपूर्वक
अर्ज करून शासन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment