स्वातंत्र्य दिनी नागरिकांनी राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

स्वातंत्र्य दिनी नागरिकांनी राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखावा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलढाणा,दि.14 (जिमाका) : देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे होणार असून, या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वजसंहितेनुसार ध्वजाची अवहेलना होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत असून नागरिकांनीही राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या