चिखली तालुक्यातील 10 महसूली गावांत सेविका व मदतनिस पदाची पदभरती

 

चिखली तालुक्यातील 10 महसूली गावांत सेविका व मदतनिस पदाची पदभरती

 बुलडाणा, (जिमाका) दि. 19 :  एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प चिखली अंतर्गत 10 महसूली गावांत 1 सेविका व 10 मदतनीस असे एकूण 11 रिक्त पदाची भरती होणार आहेत. या पदाकरीता दि. 28 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज स्विकृत केले जाणार असून इच्छुक 12 वी पास स्थानिक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी केले आहे.

 अर्जासोबत तहसिलदार, चिखली यांचा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया अटी व शर्तीनुसार पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे.  त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेविका पदासाठी महसुली गाव ऐनखेड येथे एक पद, तसेच मदतनिस पदासाठी अमडापूर येथे दोन पद, तर रोहडा, कोलारा, सोनेवाडी, आमखेड, नायगांव बु., ब्रम्हपूरी, डोंगरगाव व गोद्री या महसूली गावात प्रत्येकी एक याप्रमाणे असे सेविका व मदतनिस 11 रिक्त पदे भरती केली जाणार आहे. यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत होऊन अंगणवाडी सेवांद्वारे बालक, गर्भवती व माता यांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या