राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुलढाणा,दि.20(जिमाका):  हॉकीचे जादुगर स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवसानिमित्त संपुर्ण भारतात 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन  खेळाडूंचा सत्कार,खेळाचे प्रात्यक्षिक, विविध क्रीडा स्पर्ध व कार्यक्रमाचे आयोजन दि. 29 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार आहे.

 

महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणामार्फत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार, फुटबॉल, हँडबॉल प्रात्यक्षिक सामना, लाठी व काठी प्रात्यक्षिक, जिल्हा स्तरीय वुशू स्पर्धा व विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन जिल्ह्यातील  शाळा, महाविद्यालयात साजरा करण्यात येणार आहे. तसेच मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमा पुजन, त्यांच्या जीवनावर व्याख्यान, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन  इत्यादी  कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.

सदर कार्यक्रमामध्ये सन 1 ऑगस्ट 2024 ते 30 जुलै 2025 मध्ये शालेय व अधिकृत एकविध खेळ संघटनेव्दारा आयोजित अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य तथा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी आपल्या प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी,  जांभरुन रोड, बुलढाणा येथे दि.25 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. जेणेकरुन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने प्रमाणपत्र व मेडल देवुन सत्कार करण्यात येईल. तरी दि.29 ऑगस्ट 2025  रोजी सकाळी 10 वाजता गुरुकुल इंग्लिशCBSC) स्कूल , धाड रोड, बुलढाणा येथे उपस्थित राहावे. नमूद केलेल्या तारखेच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य तथा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. अंतिम तारखे नंतर कोणत्याही खेळाडूंचे प्रमाणपत्र स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या