मलकापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुक व विसर्जनाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

मलकापूर शहरातील गणेशोत्सव मिरवणुक व विसर्जनाच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकारी यांचे आदेश

बुलढाणा,दि.18 (जिमाका):  मलकापूर शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या कालावधीत गणेश मंडळाकडून मिरवणुक व विसर्जनाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील वाहतुक दि. 27 ऑगस्ट 2025 व दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.

  मलकापूर शहरातील गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी 12 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपावेतो तसेच दि. 6 सप्टेंबर रोजी 12 ते रात्री 12 वाजेपावेतो वाहतुक मार्गात पर्यायी व्यवस्था केली आहे.

 पर्यायी मार्ग याप्रमाणे : बुलढाणा–दाताळा–मलकापूर मार्गे मुक्ताईनगर, नांदुरा, भुसावळकडे जाणारी वाहने दाताळा टोलनाका-घिणी-बेलाड-एनएच 53 वरुन, मुक्ताईनगर-धरणगाव-मलकापूर मार्गे-दाताळा-मोताळा-बुलढाणा जाणारी वाहने एनएच-53 ने बेलाड फाटा-बेलाड-घिणी-दाताळा-टोलनाका मार्गे बुलढाणा, एनएच-53 ने मलकापूर मार्गे दाताळा-मोताळा-बुलढाणा जाणारी वाहने एनएच 53 ने बेलाड फाटा-बेलाड-घिणी-दाताळा-टोलनाका मार्गे बुलढाणा, बोदवड-मलकापुर मार्गे मुक्ताईनगर नांदुरा-खामगांव जाणारे वाहने बोदखेडे-वानखेडे पेट्रोलपंप-दाताळा-घिर्णी-बेलाड-बेलाड नांदुरा-मुक्ताईनगर या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना व वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या