बहु-उत्पादन उच्च मूल्य क्लस्टर व पेरि-अर्बन भाजीपाला क्लस्टर स्थापनेसाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले
बहु-उत्पादन उच्च मूल्य क्लस्टर व पेरि-अर्बन भाजीपाला क्लस्टर स्थापनेसाठी
इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले
बुलढाणा, दि. 22 (जिमाका): केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत
राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बहु-उत्पादन उच्च मूल्य क्लस्टर
(Multi-commodity high value clusters) तसेच पेरि-अर्बन भाजीपाला क्लस्टर
(Peri-urban Vegetable clusters) स्थापनेसाठी इच्छुक संस्थांकडून अभिरुची दर्शविण्याकरिता
प्रस्ताव (EOI) मागविण्यात आले आहेत.
या
योजनेद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs/FPCs) आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून उत्पादन,
प्रक्रिया, साठवण, मूल्यवर्धन, विपणन यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनक्षमता
वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
बहु-उत्पादन
उच्च मूल्य क्लस्टर : आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, कांदा,
बटाटा, भाजीपाला, फुलशेती, मसाले पिके इत्यादींवर भर. शेतकरी गटांना प्रक्रिया, साठवण,
कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, निर्यात सुविधा उपलब्ध होणार. प्रस्तावित प्रकल्पासाठी किमान वार्षिक Farm
Gate Value 200 कोटी रुपये असणे बंधनकारक. प्रकल्पात किमान 20% शेतकरी घटकाचा सहभाग
आवश्यक. 20 टक्के टर्म लोन व किमान 20 टक्के इक्विटी कॉन्ट्रीबुशन अनिवार्य.
पेरि-अर्बन
भाजीपाला क्लस्टर : टोमॅटो, कांदा, बटाटा, ढोबळी मिरची, गवार, मटार, वांगी, कोबी, फ्लॉवर,
मुळा, शेवगा, पालक, कारली, भोपळा, दोडका, लिंबू, आले, हिरवी मिरची इत्यादी प्रमुख भाजीपाला
पिके. शेतकऱ्यांच्या भाजीपाला उत्पादनाचे संकलन,
प्रक्रिया, साठवण, विपणन, निर्यात यावर भर. किमान Farm Gate Value 15 कोटी रुपये असणे
आवश्यक. 20 टक्के टर्म लोन व किमान 20 टक्के
इक्विटी कॉन्ट्रीबुशन अनिवार्य.
अर्थसहाय्याचे
स्वरूप : एकूण प्रकल्प खर्च A Component,
Farmer Component या दोन घटकामध्ये विभागलेला आहे. दोन एकूण प्रकल्प मूल्यामध्ये
शेतकरी घटक कमीत कमी ४० टक्के असावा, दोन्ही संकल्पनांमधील घटकाची अंमलबजावणी विहित
कालमर्यादेमध्ये पुर्ण केल्यास प्रोत्साहनात्मक ५
टक्के अतिरिक्त निधी अनुज्ञेय राहील. मात्र सदर प्रकल्पाकरीता बांधकाम या घटकावरील
एकूण खर्च हा प्रकल्प खर्चाच्या ३० टक्के पेक्षा जास्त नसावा. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब
केल्यास त्यास प्रकल्प खर्चाच्या १० टक्के प्रोत्साहनात्मक अतिरिक्त निधी अनुज्ञेय
राहील.
अर्ज
करण्याची कार्यपद्धती: प्रस्ताव सादर करणेकरीता अंमलबजावणी यंत्रणेचे पात्रता निकष
व सविस्तर मागदर्शक सुचना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या https://nhb.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्यानुषंगाने अंमलबजावणी यंत्रणेकरीता
इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
दि. 15 ऑगस्ट 2025 ही दुस-या टप्प्यातील Cut of Date होती. परंतु राष्ट्रीय
बागवाणी मंडळ, नवी दिल्ली यांनी दि. २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा (IA) म्हणून काम करण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी
ऑनलाईन पोर्टलद्वारे
https://www.nhb.gov.in/OnlineApplication/Online_Registration_Intermediate_Page.aspx
या वेबसाईटर अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना
https://nhb.gov.in राष्ट्रीय बागवानी मंडळ यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. योजनेबद्दल
अधिक माहितीसाठी शीतल थोरात (८३७८९१३७४३), तेजल खरात (९६६५८६०९८०) व महाराष्ट्र राज्य
फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ,पुणे कार्यालय २९७०३२२८ यांच्याशी संपर्क करावा.
Comments
Post a Comment