किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी आवश्यक
बुलढाणा, दि. 28 (जिमाका): हंगाम
2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व
NCCF च्या वतीने पणन महासंघामार्फत कडधान्य व तेलबिया पिकांची खरेदी करण्यात येणार
आहे. खरेदीसाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी नोंद असलेला 7/12 उतारा आवश्यक राहणार आहे.
कडधान्य
व तेलबिया पिकांमध्ये मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश असून संपूर्ण खरेदी
प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम व पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी दिली. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत
खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत
आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा शेतकऱ्यांना खरेदी योजनेत सामील होता
येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
00000
Comments
Post a Comment