"ऑपरेशन सिंदुर सन्मान" महारक्तदान शिबिरात 575 बॉटल विक्रमी रक्तसंकलन

 




"ऑपरेशन सिंदुर सन्मान" महारक्तदान शिबिरात 575 बॉटल विक्रमी रक्तसंकलन

 

बुलढाणा, दि.18 : राज्य उतपादन शुल्क, बुलढाणा विभाग व देशी विदेशी लिकर असोशिएसनमार्फत दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सहकार विद्या मंदीर सभागृह येथे "ऑपरेशन, सिंदुर सन्मान" महारक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५७५ बॉटल इतके विक्रमी रक्तसंकलन करण्यात आले. हे रक्तदान शिबीर अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले.

 

या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार धीरज लिंगाडे, संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपवनसंरक्षक सरोज गवस, माजी आमदार विजयराज शिंदे, बुलढाणा अर्बन पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष कोमल सुकेश झंवर, सामाजिक कार्यकर्ते रविकांत तुपकर, अॅड. जयश्री शेळके, ॲड. नाझेर काझी, अधीक्षक डॉ. पराग नवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या महारक्तदान शिबीराचे उदघाटक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील, प्रमुख्‍ पाहुणे आमदार संजय गायकवाड यांनी या रक्तदान शिबीर आयोजनाबाबत राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे कौतुक केले. तसेच पुढेही ही परंपरा कायम राहील यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

महारक्तदान शिबिरात सात रक्तपेढ्यांचा सहभाग

 

या महारक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्याकरिता शासकीय रक्तपेढी बुलढाणा, शासकीय रक्तपेढी शेगांव , शासकीय रक्तपेढी खामगांव, लिलावती रक्तपेढी, बुलढाणा,  जनकल्याण रक्तपेढी, जालना, दत्ताजी भाले रक्तपेढी, छत्रपती संभाजी नगर,  डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला इत्यादी रक्तपेढीकडून रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडण्यात आली.

 

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी या शिबीरात आपले मत व्यक्त केले आहे. राज्य उतपादन शुल्क अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी शिबीरास प्रत्यक्षपणे सहकार्य करणा-यांचे तसेच रक्तदाते आणि देशी विदेशी लिकर असोशिएसनचे आभार व्यक्त केले.

 

या महारक्तदान शिबीराचे प्रास्ताविक करतांना  डॉ. पराग नवलकर यांनी शिबीराविषयी माहिती दिली. या शिबीराचे सूत्रसंचालन राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे, यांनी केले असून तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुध्दा या महारक्तदान शिबीरास उपस्थिती दर्शवून रक्तदान करुन सेवाकार्यात सहभाग नोंदविला.

 

डॉ. पराग नवलकर यांचे विक्रमी रक्तसंकलन

 

डॉ. पराग मोरेश्वरराव नवलकर यांनी यापूर्वीसुध्दा राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या वतीने यवतमाळ, वाशिम, अहिल्यानगर, जालना या जिल्ह्यात रक्तदान शिबीर राबविले असून आतापर्यंत एकूण 8586 बॉटल इतके विक्रमी रक्तदान संकलनाचा यशस्वी विक्रम केलेला आहे. तसेच बुलढाणा येथे सुध्दा 575 बॉटल इतके विक्रमी रक्तदान संकलन झालेले आहे. असे एकूण 9161 बॉटल इतके विक्रमी रक्तसंकलन झालेले आहे.

 

चौकट : माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क, विभागाने रक्तदान शिबीर राबविण्यासारखे महान कार्य करण्याचे प्रथमतः बघत आहे. व अशा कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत व यापुढे. सुध्दा असे कार्यक्रम या विभागामार्फत होत राहोत यासाठी शुभेच्छा देतो.- ना.मकरंद पाटील, पालकमंत्री, बुलढाणा.

 

 

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या