उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास 26 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 





उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी

अर्ज करण्यास 26 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांची घोषणा

बुलढाणा, दि. 25 (जिमाका): राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025’ साठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या संदर्भात घोषणा करताना सांगितले की, आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 असेल. अधिकाधिक मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी मुदतवाढ दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेचे अर्ज राज्य शासनाच्या अधिकृत https://ganeshotsav.pldmka.co.in या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहेत. मंडळांनी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत.

या स्पर्धेत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पारितोषिके देण्यात येणार असून, गणेशोत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री अॅड. शेलार यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या