धार्मिक सण, जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
धार्मिक सण, जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 22 (जिमाका): गणेशउत्सव, दुर्गाउत्सव, विविध जयंती उत्सव तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक
उत्सव साजरे करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विशस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम
41-क अन्वये परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व मंडळांनी परवानगी अर्ज ऑनलाईन
पध्दतीने सादर करावे, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त दु.के. साहू यांनी केले आहे.
परवानगी
अर्ज धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्या www.charity.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर
‘माहिती प्रणाली’ या सदराखाली 41-क परवानगी या शिर्षकात उपलब्ध आहे. अर्ज करण्याची
सविस्तर पद्धत तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
ऑनलाईन
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : मंडळाच्या ठरावाची
प्रत, जागा मालकाचे ना-हरकत पत्र, तसेच पत्त्याच्या
पुराव्यासाठी लाईट बिल व आधारकार्डची प्रत(संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषद परवानगीसह), पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक
आयोग ओळखपत्र इ.) प्रथम वर्ष असल्यास मागील
वर्षाचा हिशोब, मागील वर्षी घेण्यात आलेल्या
41- C परवानगीची प्रत कागदपत्रांची आवश्यकता नाही.
परवानगी
मिळण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक असून, अर्ज मंजूर झाल्यानंतर
परवानगीची प्रत संबंधित मंडळांना ई-मेलद्वारे प्राप्त होईल. उत्सव साजरा करण्यासाठी
वेळेत परवानगी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी,
असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment