जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय यश; राज्य आरोग्य मानांकनात पहिले स्थान
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय यश;
राज्य आरोग्य मानांकनात पहिले स्थान
बुलढाणा,दि.18 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या राज्य आरोग्य
मानांकनात बुलढाणा जिल्हा एप्रिल व मे 2025 मध्ये दोन महिने सतत राज्यात प्रथम क्रमांकावर
आला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आरोग्य विभाग
व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच अत्तिरिक्त जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले, जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ. मिलींद जाधव,
सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. हरी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा
साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान व आरोग्य विभागातील
सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त कामगिरीमुळे शक्य झाले असल्याचे जिल्हा आरोग्य
अधिकारी यांनी म्हटले आहे. आरोग्य सेवेत कार्यक्षम नियोजन, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय
आरोग्य अभियानांची प्रभावी अंमलबजावणी तसेच जनतेपर्यंत पोहोचवलेली दर्जेदार सेवा या
यशामागील महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढेही बुलढाणा जिल्हा आरोग्य
विभागाने अशीच कामगिरी करून राज्यातील इतर जिल्ह्यांना आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षाही
त्यांनी व्यक्त केली.
000000
Comments
Post a Comment