जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य योजना; 15 सप्टेंबर अर्ज मागविले

 जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य योजना; 15 सप्टेंबर अर्ज मागविले

बुलढाणा,दि.18 (जिमाका):   जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य या योजनेंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार सहकारी संस्थेचे क्रियाशील सभासद तसेच वैयक्तिक क्रियाशील मच्छीमारांनी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त म.वि. जयस्वाल यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत तयार नायलॉन मोनोफिलेमेंट जाळी खरेदीसाठी प्रति सभासद/मच्छीमारास 20 किं.ग्रॅमपर्यंत 50 टक्के अनुदान मंजूर आहे. जाळ्याची किंमत प्रतिकिलो कमाल 800 रुपयेपर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच बिगर यांत्रिकी नौका खरेदीच्या 50 टक्के अनुदान किंवा प्रकल्प किंमत यापैकी जे कमी असले तेवढे अनुदान देय राहिल. लाकडी नौका प्रकल्प किंमत 60 हजार कमाल अनुदान 30 हजार रुपये, पत्रा नौका प्रकल्प किंमत 30 हजार रुपये कमाल अनुदान 15 हजार रुपये, फायबर नौका प्रकल्प किंमत 1 लाख 20 हजार रुपये कमाल अनुदान 60 हजार रुपये किंवा नौका खरेदीच्या 50 टक्के अनुदान देय राहिल.

मासेमारी साधनांवर अर्थसहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मच्छीमारांनी आवश्यक कागदपत्रांसह व संबंधित संस्थेच्या शिफारसीसह आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा यांच्या कार्यालयात 15 सप्टेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बसस्टँड समोर, धाड रोड, बुलढाणा- 443001 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या