अवयवदान मोहीम नसून मानवतेची गरज -मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात
अवयवदान मोहीम नसून मानवतेची गरज
-मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात
जिल्हा परिषदेत अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न
बुलढाणा,
दि.14(जिमाका) : “अवयवदान हे मृत्यूनंतरही कोणाला जीवन
देण्याची संधी असलेले महान कार्य आहे. ही केवळ मोहीम नसून मानवतेची गरज आहे.
प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा,”
असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले.
जिल्हा
परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आयोजित अवयव दान विषयक प्रतिज्ञा व जनजागृती
कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या छत्रपती
शिवाजी महाराज सभागृहात येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
व्यासपीठावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
अमोल गिते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा माता बाल संगोपण
अधिकारी डॉ. मिलींद जाधव, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रंजित
मंडाले, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरी, जिल्हा हिवताप अधिकारी
शिवराज चौहान, तसेच जि.वि.मा.अ. राजेश धुताडमल उपस्थित होते.
यावेळी
जिल्हा स्तरावर आरोग्य यंत्रणेद्वारे अवयवदान जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली
जात आहे असल्याची माहिती
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.
तसेच
सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व
कर्मचारी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील
नागरिकांमध्ये अवयव दानाबाबत सकारात्मक जनजागृती होऊन अवयवानाची प्रतिज्ञा
करण्याचे, असा आवाहन देखील करण्यात आले.
Comments
Post a Comment