राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचा दिमाखदार समारोप; महाराष्ट्राच्या तीन संघांची घोषणा १४ वर्षांखालील मुले, मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड
बुलढाणा, दि.16
(जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा
क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र
हॉकी आणि बुलढाणा हॉकी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय
हॉकी स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला. दि. १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सहकार
विद्या मंदिर, बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध विभागांतील खेळाडूंनी
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहकार
विद्या मंदिर येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात पुणे
विभागाने प्रथम, कोल्हापूर विभागाने द्वितीय, तर मुंबई विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने प्रथम, पुणे विभागाने द्वितीय, तर मुंबई विभागाने
तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात मिशन लक्षवेध, पुणे यांनी प्रथम, कोल्हापूर विभागाने
द्वितीय, तर क्रीडा प्रबोधिनीने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने
प्रथम, मुंबई विभागाने द्वितीय, तर नागपूर विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.
समारोपीय कार्यक्रमाला सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य अलगर सामी, ऑलिम्पिक खेळाडू
अजित लाक्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर,
प्रशांत मंडले, बुलढाणा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव प्रकाश खेत्रे, सेवानिवृत्त तालुका
क्रीडा अधिकारी उमेश बडवे, सुशील सुर्वे, राज्य क्रीडा मार्गदर्शक वैशाली सुळ, आरती
हळगीळ तसेच निवड समिती सदस्य सय्यद आबिद यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या
हस्ते १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या विजेत्या व उपविजेत्या संघांतील खेळाडूंना पदके
व चषक देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्राच्या संघांची निवड
या समारंभात आगामी ७० व्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या
संघांची घोषणा करण्यात आली. १४ वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेशातील
मंदसौर येथे दि. ८ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी अभिषेक
चौधरी (पुणे), अमान शेख (मुंबई), आयुष माने (मुंबई), शहाजी घुमरे (पुणे), ओमकार डोंगरे
(पुणे), स्वर पाटील (कोल्हापूर), तौसीफ म्हाळदार (कोल्हापूर), रणवीर नागलोत (पुणे),
स्वराज साळुंके (मुंबई), परमवीरसिंग पुजारी (लातूर), अदनान सनदी (कोल्हापूर), अनुज
पाटील (नाशिक), रुद्र शिंदे (छत्रपती संभाजीनगर), अंश राऊत (नागपूर), मोहित पानगव्हाणे
(नाशिक), हर्षल बावणे (अमरावती), विराज जाधव (कोल्हापूर) आणि संकेत राठोड (अमरावती)
यांची निवड झाली आहे.
राखीव खेळाडूंमध्ये विराज पाटील, श्रेयस यादव (दोघेही कोल्हापूर), शिल तामगाडगे
(नागपूर), रयान अहमद (अमरावती), मानव महाले (पुणे), सिद्धांत संजयकुमार (अमरावती) आणि
मंधन खवले (नागपूर) यांचा समावेश आहे.
१४ वर्षांखालील मुलींची राष्ट्रीय स्पर्धा ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे दि. २०
ते २४ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. या संघात पूजा गिरे (मुंबई), माही बेलदार,
साक्षी नाळे (पुणे), तन्विका चिक्रोड (लातूर), स्नेहा सिंग (छत्रपती संभाजीनगर), अपूर्वा
निरगुडे (नाशिक), रिया खुरसुंगे (अमरावती), ओवी पारखे, रेणुका जगताप (मुंबई), जयश्री
खोके (नागपूर), आराध्या सोनवणे, वैभवी राहीगुडे, आरोही नवले (कोल्हापूर), अर्चना खर्डे
(मिशन लक्षवेध, पुणे), विशाखा महाजन (पुणे), आरोही वळवी (नाशिक), शरयू गुळमकर (पुणे)
आणि अनुष्का कारंजकर (सांगली) यांची निवड झाली आहे.
राखीव खेळाडूंमध्ये राजवर्धिनी शिंदे, शाल्वी केसरकर, श्रुष्टी पाटील (कोल्हापूर),
सुप्रिया गावीत (मिशन लक्षवेध, पुणे), कायरा पालकर व श्रेया साळवी (मुंबई) आणि ग्रिषा
साळवी (नाशिक) यांचा समावेश आहे.
१७ वर्षांखालील मुलींची राष्ट्रीय स्पर्धा रांची, झारखंड येथे दि. २८ ते ३१ जानेवारी
२०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या संघासाठी देविका नायर (मुंबई), डिम्पी
जाधव (अमरावती), मृण्मयी घोरपडे (कोल्हापूर), आझील शेख (पुणे), लावण्या बावणे, मोनाली
सरगर (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर), सरिता वसावे (नाशिक), अदिती शेट्टी (मुंबई),
वेदिका वाघमोरे (कोल्हापूर), देवयानी सुपलकर (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर),
गायत्री खरात (कोल्हापूर), अन्वी रावत, प्राची कटरे (मिशन लक्षवेध, पुणे), अनुराधा
टेकाळे (लातूर), रिया बगमारे (नागपूर), ऋतुजा पाटील, फाल्गुनी पिल्लारे (अमरावती) आणि
सई सावंत (नाशिक) यांची निवड झाली आहे.
राखीव खेळाडूंमध्ये तन्वी जोगदंड (अमरावती), आरोही पाटील (कोल्हापूर), श्रावणी
निरभवणे (नाशिक), अप्रिता कोढारे (मिशन लक्षवेध, पुणे), केलेन नेल्सामणी (पुणे), शगुन
शर्मा (मुंबई) आणि अक्षरा भारसाकळे (क्रीडा प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश
आहे.
निवड झालेले तिन्ही संघ आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
करणार असून, खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा जिल्हा
क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी व्यक्त केली.
0000





Comments
Post a Comment