महात्मा फुलेंच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सर्व समाजघटकांचे योगदान! स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्याचा ऐतिहासिक संघर्ष महात्मा जोतीराव फुले यांचा विरोध कोणत्याही विशिष्ट समाजाला नसून सामाजिक विषमता आणि ब्राह्मण्यवादी विचारसरणीला होता. त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्यात विविध समाजघटकांतील व्यक्तींनी सहकार्य केले, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुलींच्या शिक्षणासाठी फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या ऐतिहासिक कार्याला तत्कालीन समाजातील काही घटकांकडून तीव्र विरोध झाला. सावित्रीबाई फुले यांना शाळेत जाताना चिखल व शेणाचा मारा सहन करावा लागला. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य अखंड सुरू ठेवले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी फुले दाम्पत्याने दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे.


 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या