मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत; अंतिम मतदार यादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

 


 

बुलढाणा, दि. 19 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबरपर्यंत तर अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

 

या पुनरीक्षणांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांसाठी (ASDD) गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रपत्रांसंदर्भातील कार्यवाहीसाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

 

गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे. तसेच प्राप्त गणना प्रपत्रे निकाली काढण्याची प्रक्रिया १० डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

 

महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोटीस टप्पा तसेच दावे व हरकतींचा निपटारा करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोगावार यांनी दिली आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या