अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाइकांचा शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

 



 

बुलढाणा, दि. 5 (जिमाका) : बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मृत्यू झाला. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना ४ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीजवळ ओळख पटविण्यासाठी कोणतीही मालमत्ता अथवा कागदपत्रे आढळून आलेली नाहीत.

 

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६५ वर्षे असून, उंची सुमारे 6 फूट ५ इंच  रंग गोरा असल्याचे नमूद आहे. त्यांच्या नातेवाइकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदारांनी केले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास बुलढाणा शहर पोलीस ठाण्याशी  किंवा 9850923101 / 9623243733 या नंबरवर संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या