बुलढाण्यात जलतारा कार्यशाळेचे आयोजन ; शेतकरी बांधवांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा - डॉ. अमिता पवार यांचे आवाहन
बुलढाणा,दि. 17 (जिमाका): पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत जलतारा संशोधक डॉ.
पुरुषोत्तम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जलतारा व विकसित भारत रोजगार आणि आजीविका
हमी मिशन (ग्रामीण) याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा आज दि.
१८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती बुलढाणा येथील वसंतराव नाईक सभागृहात
आयोजित करण्यात आली आहे.
या
कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड
तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेमध्ये
शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व रोजगार
सेवक यांना जलतारा आणि ग्रामीण रोजगार व आजीविका योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार
आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
पंचायत समिती बुलढाणाच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment