बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू; पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 01 (जिमाका): शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी बुलढाणा येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, रिक्त जागांवर मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज www//swayam.mahaonlina.gov.in या वेबसाईडवर परीपुर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह वसतीगृहात अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता ११ वी व १२ वी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित वसतीगृहात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे.     

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता १० वीची गुणपत्रिका (लागू असल्यास), सन २०२६-२७ चा उत्पन्नाचा दाखला,             जातीचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड, विद्यार्थ्याच्या नावाचे बँक पासबुक, तीन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असून, अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.

प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, बुलढाणा, जि. बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन वसतीगृह प्रशासनाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी